Share

पैसे दिलेच नाही तर मग ED कशाला? अनिल देशमुखांवरील कारवाईवरून काँग्रेसचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आता वाढ झाली असून ईडीने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर आता पैशाची अफरातफर केल्याचा आरोप करत ईडीकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशमुख यांच्या चौकशीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आला. आता या प्रकरणात ED ने सुद्धा एन्ट्री केली आहे. ईडीडून अनिल देशमुख यांच्या विरोधात मनी लॉन्डरिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच अनिल देशमुख यांची ईडी मार्फत देखील चौकशी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान,या सर्व घडामोडी घडत असताना आता राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होऊ लागले आहेत कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. ‘हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे.कोरोना हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे, तसंच राजकीय सूडबुद्धी ही आहे, अशी टीका सावंत यांनी केली.

तसंच, परमबीर सिंग यांच्या खोट्या आरोपांवरून कारवाई केली आहे. आरोपांचे विश्लेषण केले तरी सचिन वाझेने 100 कोटी जमवण्यास सांगितले असे म्हटले. परमबीर सिंग यांनी ही तेच म्हटले. पैसे दिले असे आरोपकर्तेही म्हणत नाही. मग CBI धाडी कशावर टाकत होती? पैसे दिलेच नाही तर ED कशाला? असा सवाल सावंत यांनी विचारला आहे.

जर पैसे दिले असे CBI व ED चे म्हणणे असेल तर परमबीर सिंग व वाझेवर कारवाई का नाही? हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे. जनता ही आता हे ओळखून आहे. या राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक झाला आहे, असा टोलाही सावंत यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!