जालना: कोरोना या आजाराने आधीच राज्यभरात खळबळ माजवलेली असतानाच आता त्यात नव्या आजाराची भर पडली आहे. हा आजार आहे म्यूकरमायकोसिस. दिल्ली व गुजरातमध्ये या आजाराने आधीच शिरकाव केला होता, आता तो इथेही वाढू लागला आहे. जालन्यात ११ रुग्णांना याची लागण झाली असल्याने एकाच खळबळ उडाली आहे. हे रुग्ण एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
जिल्ह्यातील ११ रुग्णांना म्यूकरमायकोसिस आजार झाल्याचे निष्पन्न झाले असून यात तीन रुग्ण कोरोनाबाधित तर आठ जण कोरोनातून बरे झालेले आहेत. दरम्यान, आतापर्यंत यातील नऊ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉ. संजय राख यांनी दिली. मधुमेह व वयस्कांमध्ये म्यूकरमायकोसिसची लक्षणे दिसून आली असली तरी सर्वच वयोगटांत हे प्रमाण आहे.
यामध्ये चेहरा व डोक्याच्या हाडांवर एक प्रकारची बुरशी चढते व त्यात बारीक-बारीक छिद्रे पडतात, यालाच ब्लॅक फंगस असेही म्हणतात. या आजारात चेहऱ्यावर इन्फेक्शन झाल्यावर चेहरा सुजतो, डोकेदुखी सुरू होते, नाक बंद होते, उलटी येते, ताप, छातीदुखी, सायनस कंजेशन आणि तोंडामध्ये काळ्या जखमा होतात. दरम्यान, म्यूकरमायकोसिसच्या ११ रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून यातील नऊ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. उर्वरित दोन रुग्ण वेटिंगवर आहेत.
तसेच नेमका किती दिवसात रुग्ण बरा होईल हे सांगता येणार नाही. यामुळे रुग्ण बरा होण्यासाठी १५-२० दिवससुद्धा लागू शकतात. यात रुग्णांना विविध प्रकारची इंजेक्शन द्यावे लागतात, जी खूप महागडी आहेत, असे डॉ. राख म्हणाले. तसेच रुग्णांनी लक्षणे दिसू लागताच तत्काळ हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावेत, जेणेकरून वेळीच औषधोपचार करता येतील, असेही त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- भल्याभल्या गोलंदाजाच्या चिधंड्या उडवणारा ख्रिस गेल, ‘मातृदिनी’ झाला भावूक
- ‘भाजपची भाषा रामराज्याची होती परंतु आता उत्तरप्रदेश-बिहार रामभरोसे सोडले’
- बीसीसीआयच्या खेळाडूंना कडक सूचना ; असे झाल्यास स्वत:ला इंग्लंड दौर्याबाहेर समजा
- ‘हीच ती जीची मी वाट पाहत होतो’; डिसले गुरुजींनी मिळवलेली ट्रॉफी अखेर आली…
- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मोठी मागणी


