Share

मुंबईच्या रुग्णांची नोंद पुण्यात ? ठाकरे सरकारचं ‘मुंबई मॉडेल’ खोटं; राणेंचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबई मधील कोरोना रुग्णसंख्या ही लक्षणीय अंकांनी घसरत असल्याचं मुंबई महापालिका प्रशासनाच्या आकडेवारी नुसार समोर येत आहे. भाजपने मात्र या कमी होणाऱ्या आकड्यांवर संशय घेतला असून आकडेवारीची लपवाछपवी सुरु असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे. तर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत प्रशासनासह सामान्य मुंबईकरांचं कौतुक केलं आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांची नोंद पुणे आणि इतर शहरांच्या खात्यात करणे, हाच ‘मुंबई पॅटर्न’ आहे का? अनेक लोकांनी मला याबद्दल माहिती दिली आहे. मुंबईत एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाली की त्याला पुण्याच्या कोविड वॉर रुममधून फोन येतो. अशा प्रकारे ठाकरे सरकार कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये गफलत करत असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

यासोबतच, कोरोना रुग्ण मुंबईतून पुण्यात ट्रान्सफर केले जातात म्हणजे त्यांना प्रत्यक्षात एका शहरातून दुसऱ्या शहरात हलवले जात नाही. केवळ त्यांची नोंद इतर शहरांच्या कोरोना आकडेवारीत केली जाते. त्यामुळे इतर शहरांतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा हा मुंबईच्या तुलनेत जास्त राहतो, असा गंभीर दावा देखील नितेश राणे यांनी केला आहे. आता या गंभीर आरोपांना महाविकास आघाडीतील नेते काय प्रत्युत्तर देणार याकडं राजकीय क्षेत्राचं लक्ष्य लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!