Share

जालना जिल्हा; विक्रमी रुग्णसंख्या ७६८ अहवाल पॉझिटिव्ह, ५ बळी

Published On: 

जालना: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, सोमवारी विक्रमी ७६८ बाधित रुग्णांची नोंद झाली, तर उपचारादरम्यान पाच रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे बाधितांची संख्या ३३ हजार ११८, तर मृतांचा आकडा ५७६ वर जाऊन पोहोचला आहे. दरम्यान, आतापर्यंत २६ हजार २५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ही बाब काहीशी दिलासा देणारी असली तरी दररोजच्या वाढत्या रुग्ण व मृतांचे आकडे चिंता वाढवणारे आहेत.

जालना शहर २३०, दुधना काळेगाव १, भाटेपुरी ५, नेर १, हिवर्डी ४, बोरगाव १, बोरखेडी २, चंदनझिरा ५, डुकरी पिंप्री १, गोलापांगरी १, हडप १, हिगवर्डी १, इंदेवाडी ६, जळगाव १, जामवाडी ३, कचरेवाडी २, कडवंची ३, मोतीगव्हाण ६, नंदापूर १, नागेवाडी १, नसडगाव ८, नाव्हा १, नेर २, पारेगाव १, राममूर्ती १, शेवली १, सिंधी काळेगाव ५, तांदुळवाडी १, उटवद ३, वडीवाडी १, वाघ्रुळ १, वझर १, मंठा १५, दहिफळ १५, ढोकसळ ५१, लावणी १, लिंबखेडा २, पांगरी २, पाटोदा ३१, रामतीर्थ २, तळणी ६, वाघोडा १, परतूर ३८, आष्टी १, अंबा २, ब्राम्हणवाडी १,

ब्राम्हणवडगाव १, दैठणा २, दहिफळ भोगाने ४, कोरेगाव १, शिंगोणा २, वाढोणा १, वाटुर ११, वाघाडी २, घनसावंगी २७, अंतरावाली दाई १, अरगडे गव्हाण १, भायेगव्हाण १, बोडखा ४, बोलेगाव १, बोरगाव २, ढाकेफळ २, गुरुपिंप्री २, जांबसमर्थ ३, कुंभार पिंपळगाव १३, लिंबी १, लिंबोणी २, मच्छिंद्रनाथ चिंचोली १, मंगुजळगाव ६, पानेवाडी ३, पिंपरखेड ३, रांजणी ४, राजाटाकळी ३, राजेगाव ३१, रामसगाव ६, राणी उंचेगाव ६, सिंदखेड २, तीर्थपुरी २, अंबड ६, भांबेरी १, चिंचखेडा १, जामखेड १ सह आरटीपीसीआरद्वारे ६४६ तर अँटिजन तपासणीद्वारे १२२ असे एकूण ७६८ कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!