जळगाव : राजकारण म्हटलं की, वाद-विवाद ,सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांमधील अरोप-प्रत्यारोपाची खेळी ही आलीच. आपल्या सर्वांना माहित आहे की, भाजप पक्षाचे माजी नेते म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांची जुगलबंदी सारखीच चालू असते. अशातच एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांना चांगलेच डिवचलं आहे.
“दुश्मन ना करे दोस्त ने ऐसा काम किया है जिंदगी भर के लिये बदनाम किया है”, हे गाणं म्हणत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांना चांगलाच टोला लगावला आहे. एकनाथ खडसेंनी हे गाणं एका शोमधील एक टास्क करताना गायलं आहे.
झी-मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ या शोमध्ये एकनाथ खडसे आणि किरीट सोमय्या यांना बोलवण्यात आले होते. आपल्याला माहित असेल की, शोमध्ये काही मजेशीर टास्कही खेळले जातात. एकनाथ खडसेंना राजकीय नेत्यांचे फोटो दाखवून तुम्हाला आठवलेले गाणं गायचा टास्क दिला गेला होता. खडसेंना देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवण्यात आला होता. त्यावेळी खडसेंनी ते गाणं गायलं आहे.
दरम्यान, एकनाथ खडसेंसोबत किरीट सोमय्या हे देखील होते. ज्यावेळी खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर गाण गायलं त्यावेळी सोमय्यांनी मौन पाळलं असल्याचं समजतं आहे. तसेच एकनाख खडसेंनी गायलेलं गाणं ऐकून देवेंद्र फडणवीस यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :


