🕒 1 min read
औरंगाबाद : मागील वर्षी प्रमाणे यंदाही वारकरी संप्रदायाला पायी वारीला जाण्यासाठी भ्रमनिरास झाला. जड अंत:करणाने भाविकांनी नाथ महाराजांच्या पालखी समोर नतमस्तक होऊन निरोप दिला. अठरा दिवसापुर्वी नाथवाड्यातुन निघुन नाथसमाधी मंदीरात मुक्कामी असलेल्या नाथांच्या पादुकांना भानुदास एकनाथांच्या जयघोषात टाळ मृदंगाच्या निनादात शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी पालखीने शिवशाही बसमध्ये पंढरपुरकडे जाण्यासाठी प्रस्थान केले.
यावेळी राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांची प्रमुख उपस्थीती होती, दोन शिवशाही बसने चाळीस वारकरी आषाढी निमित्त नाथांच्या पादुका पालखीने पंढरपुरकडे शासकीय लवाजाम्यासोबत निघाल्या.
या प्रसंगी महिला पुरुष भक्त-भाविक वारकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने पायी दिंडी सोहळा यंदाही रद्द केल्यामुळे केवळ मानाच्या दहा दिंड्यांनाच मोजक्या वारकऱ्यांसह पंढरीत प्रवेश असणार असल्याचे फर्मान शासनाने काढले. मानाच्या दहा दिंड्यात पैठणच्या संत एकनाथांच्या पालखीचा तीसरा क्रमांक असुन आषाढीला सर्वच मानाच्या दिंड्यासह नाथांची पालखी देखील पंढरपुरात दाखल होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कृषी उत्पन्न बाजार समितीनिहाय आठ दिवसात अहवाल द्या, राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे कडक निर्देश
- अनिल देशमुख यांच्या काटोलमधील घरांमधून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
- ईडीच्या रडारवर असलेले अनिल देशमुख अटकेच्या भीतीने ‘नॉट रिचेबल’
- नंदुरबार अपघात; पंतप्रधान मोदींकडून मराठीत ट्विट करत मदत जाहीर
- नंदुरबारमध्ये गाडी दरीत कोसळली; भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू, १५ जखमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
