बीड: कोरोनाची वाढती कोरोना रुग्णांची संख्या तसेच कोरोनावर आवश्यक असलेया रेमेडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार या सर्व अडचणी जिल्ह्यात सुरूच आहेत. रेमेडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी आधी नोंदणी करावी लागत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा गोंधळ उडत आहे. रविवारी देखील असाच काहीसा गोंधळ येथे बघायला मिळाला.
रेमेडेसिवीर इंजेक्शनचा साठा संपल्याने रविवारी सकाळपासून नोंदणी बंद करण्यात आली. अचानक हा निर्णय घेतला गेला. यामुळे जिल्हाभरातून सकाळपासून आलेले रुग्णांचे नातेवाइक रांगेमध्ये ताटकळले. अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असा फलक लावताच त्यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यानंतर दुपारी नोंदणी पुन्हा सुरू केली. दरम्यान, नातेवाइकांना थेट जिल्हास्तरावर यावे लागत असल्याने आता थेट तालुकास्तरावर तहसीलदारांकडे रुग्णालयांनी रेमडेसिविरसाठी नोंदणी करण्याचा नवा आदेश काढला.
जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे. खासगी रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना हे इंजेक्शन मिळावे यासाठी रुग्णांचे नातेवाईक वणवण करत आहेत. प्रशासनाकडूनच गरजू रुग्णांना इंजेक्शन आठवडाभरापासून उपलब्ध करून दिली जात आहे यासाठी सुरुवातीला जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्रात तर त्यानंतर मागील चार दिवसांपासून औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांमार्फत अर्ज स्वीकारले जात होते.
डॉक्टरांची शिफारस, विशिष्ट नमुन्यातील अर्ज, रुग्णांचे तपासणी अहवाल जोडून हा अर्ज दिला जात असे, त्यानंतर प्रशासनाकडून उपलब्ध स्टॉक नुसार औषधांचे एजन्सी किंवा मेडिकलमार्फत वितरण होत होते. मात्र, बीड शहर वगळता इतर तालुक्यांमधील रुग्णांच्या नातेवाइकांनाही अर्ज देण्यासाठी बीड गाठावे लागत होते. त्यातही इंजेक्शन कधी मिळेल याची खात्री नसल्याने मध्यरात्रीपर्यंत थांबावे लागे. अखेर रविवारी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकास्तरावरील रुग्णांनी बीडला नोंदणीसाठी येण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत तहसील स्तरावर ही नोंदणी होणार असल्याचे जाहीर केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना हरणार देश जिंकणार; सैन्याने तब्बल ४८ तासात उभारलं आयसोलेशन सेंटर
- दौलताबादजवळ दोन वाहनांचा समोरा-समोर अपघात, तिन जण ठार
- खळबळजनक! डोळ्यात मिरची पूड टाकून जावयाने केला सासूचा खून
- ट्रक चोरून भंगारात विकणाऱ्या टोळीतील तिघे पोलिसांच्या जाळ्यात
- आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची तत्काळ हकालपट्टी करा; भाजप नेत्याची मागणी


