Share

‘हा’ कारनामा करणारा जडेजा आयपीएलमधील पहिलाच शिलेदार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात स्पर्धेत अंजिक्य असलेल्या बेंगळुरु रॉयल चॅलेजंर्स संघाला चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने ६९ धावांनी नमवले आणि पराभवाची धुळ चारली. चेन्नईने दिलेल्या १९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबी केवळ १२२ धावांपर्यंत मजल मारु शकला. रविंद्र जडेजाला त्याच्या अष्टपैलू कामगीरीमुळे सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यात रविंद्र जडेजाने अष्टपैलु कामगीरी करत आरसीबी संघाला एकटा भारी पडला. टी-२० सामन्यात ५ पेक्षा जास्त षटकार आणि गोलंदाजी करताना ३ गडी बाद करण्याची कामगिरी बजावणारा रविंद्र जडेजा आयपीएलमधील पहिलाच खेळाडू ठरला. तर जागतीक स्तरावर जडेजा दुसरा खेळाडू ठरला आहे. तो दुसरा खेळाडू डेव्हिड विली होता. डेव्हिड विली हा २०१८च्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाचा सदस्य होता.

मुळचा इंग्लंडचा अष्टपैलू डेव्हिड विलीने २०१८ टी-२० स्लॅममध्ये यॉर्कशायरसाठी खेळताना नॉर्दम्पटनशायरविरूद्ध ७९ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. या खेळीत त्याने ५ पेक्षा अधिक म्हणजे ७ षटकार मारले, तर गोलंदाजी करताना ३ गडी बाद केल आणि गोलंदाजी करताना १ षटक निर्धाव देखील टाकले होते. तर जडेजाने २८ चेंडूमध्ये ४ चौकार आणि ५ षटकारासंह नाबाद ६२ धावांची खेळी केली. तर गोलंदाजी करताना ४ षटकात १३ धावा देत मॅक्सवेल, डिव्हिलियर्स व वाशिंग्टन सुंदर यांना बाद केले. तर चौथे षटक त्याने निर्धाव फेकले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!