हिंगोली : खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना शेतकरी गटाच्या माध्यमातून – बि – बियाणे हे आता बांधावर देण्याचे नियोजन कळमनुरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येत आहे. काेरोना रुग्ण वाढीचा कहर शहरासह ग्रामीण भागामध्ये खुप मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे, त्यामुळे शेती क्षेत्रावर देखील याचा परिणाम दिसून येत आहे.
कळमनुरी तालुक्यामध्ये खरीपाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र हे अंदाजे ७५ हजार हेक्टर आहे. या परिसरात ज्वारी सोयाबीन, कापुस, उडीद, मुग, तुर या पिकांचा पेरा खुप जास्त आहे. यातही सोयाबीनचा पेरा खुप सर्वाधिक आहे. खरीपाच्या तोंडावर लॉकडाऊन, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतू शेतकरी शेतातमध्ये खरीपाच्या हंगामापुर्व पेरणीसाठीच्या मशागतीच्या कामामध्ये व्यस्त झालेला दिसून येत आहे. पेरणीच्या हंगामापुर्वी कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणुन तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये शेतकऱ्यांचे गट तयार करण्याचे काम वेगाने सुरु करण्यात आले आहे. तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये शेतकरी गटाच्या मार्फत खते, बियाण्यांची खरेदी करुन ते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचवण्याचे नियोजन करणे देखील सुरु करण्यात आले आहे.
या सर्व कामांसाठी कृषी विभाग कळमनुरी तालुका शेतकऱ्यांना सर्व मदत तसेच सहकार्य देखील करत आहे. शेतकऱ्यांना बांधावर मागेल त्या शेताकऱ्याला बांधावर खत तसेच बियाणे मिळण्याचे नियोजन करण्याचे काम वेगाने सुरु केले. तसेच शेतकऱ्यांचे १० ते २० शेतकऱ्याचे गट तयार करण्यात येत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गजानन पवार यांनी सांगितली. कोराेना तसेच लॉकडाऊन तसेच संचारबंदीच्या परस्थिती असल्याने बाजारपेठेमध्ये वाढणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच कोरोनाचा संसर्ग राेखण्याची हा स्तुत्य उपक्रम सुरु केले असल्याचे या वेळी परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले. मागच्या वर्षी बाजारातून आणलेले बियाणे बोगस निघाल्याने खुप मोठे आर्थिक नुकसान झाले होते. तसेच दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्यामुळे आता कृषी विभागाकडून घरचे बियाणे वापरण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोलापूरातील नादुरुस्त दवाखान्यासाठी पावणे चार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी,बेडची क्षमता 250 ने वाढणार
- ‘…तर भाजपा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करेल’; चंद्रकांतदादांचा सत्ताधाऱ्यांना इशारा
- टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका; पडळकरांचा आदित्य ठाकरेंना टोला
- ‘पवारांचे बस्तान बसविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आडून सोलापूर जिल्ह्याचा दिला जातोय बळी’
- मलिक, राऊत आणि आव्हाड महाराष्ट्राच्या जनतेची आणि मोदींची माफी मागतील का?


