🕒 1 min read
मुंबई : सुपर संडे मध्ये आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने हैदराबाद सनरायझर्स संघाचा ‘सुपर ओव्हर’ मध्ये पराभव करत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. दिल्लीने दिलेल्या १५९ धावांचा पाठलाग करताना हैदराबाद संघाने २० षटकात १५९ धावा केल्याने सामना टाय झाला. यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये हैदराबादने दिलेल्या ८ धावांचे लक्ष यशस्वीपणे पार केले.
सध्या चालू असलेल्या आयपीएल सामन्यात असं काही घडल, ज्याची प्रचंड चर्चा सोशल मीडियावर होते आहे. सध्या दिल्ली आणि हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यातील अशाच एका क्षणाची चर्चा सुरु आहे. या मॅचमध्ये ऋषभ पंतच्या एका कृतीनं सर्वांचं मन जिंकलं.
https://twitter.com/CricketUnlimi/status/1386366941518909440?s=20
सनरायझर्स हैदराबादची बॅटींग सुरु असताना हा प्रसंग घडला. अक्षर पटेल दिल्लीकडून 13 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरचा शेवटचा बॉल केन विल्यमसननं टोलावला आणि तो एक रन काढण्यासाठी पुढे पळाला. विल्यमसननं खेळलेला बॉल ऋषभ पंतनं पळत जाऊन अडवला आणि वेगानं नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेनं फेकला. पंतनं केलेला थ्रो अंपायरला लागला. अंपायरला बॉल लागल्याचं पाहताच पंतला त्याची जाणीव झाली. त्यानं अंपायरची माफी मागितली. पंतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. या कृतीमुळे पंतने सर्वांचे मन जिंकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोलापूरातील नादुरुस्त दवाखान्यासाठी पावणे चार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी,बेडची क्षमता 250 ने वाढणार
- ‘…तर भाजपा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करेल’; चंद्रकांतदादांचा सत्ताधाऱ्यांना इशारा
- टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका; पडळकरांचा आदित्य ठाकरेंना टोला
- ‘पवारांचे बस्तान बसविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आडून सोलापूर जिल्ह्याचा दिला जातोय बळी’
- मलिक, राऊत आणि आव्हाड महाराष्ट्राच्या जनतेची आणि मोदींची माफी मागतील का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
