नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा कहर घातला आहे. मागील वेळेपेक्षा ही लाट अधिक गंभीर असल्याने रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे गरजेचं आहे.
दरम्यान, १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी देखील लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी लसींचे नवे दर जाहीर केले आहेत. आधीच आर्थिक पेचात असलेले नागरिक नव्या किंमतींमुळे अधिक पेचात पडले असून लसीकरणामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.
देशातील कोरोनाच्या लाटेने संपूर्ण व्यवस्थेला हादरवून सोडले आहे. त्यात आरोग्य सुविधांचा होणार तुटवडा हा रुग्णांचे प्राण घेत आहे. अशा परिस्थितीत आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक भावनिक आवाहन करत कोरोना प्रतिबंधित लसीच्या किंमती या एकसमान ठेवाव्यात असे म्हटले आहे. तसेच कोरोना लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना देखील त्यांनी यावेळी ही वेळ नफा कमावण्याची नसल्याचे म्हटले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी, एक कंपनी आपली लस ४०० रुपयांनी देणार तर दुसरी कंपनी ६०० रुपयांना देणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र देशातील परीस्थिती पहिली तर ती अत्यंत हालाख्याची होत आहे. त्यामुळे देशाच्या सेवेसाठी सर्वानी पुढे यावे. कारण ही वेळ ही आपला फायदा किंवा नफा कमावून घेण्याची नाही. त्यामुळे केंद्र सरकारने यात लक्ष घातले पाहिजे. तसेच या लसींची किंमत एकच ठेवण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावेळी एक मोठी आणि महत्वाची घोषणा केली. दिल्ली सरकारने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना मोफत लस दिली जाईल असा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारने 1 कोटी 34 लाख लसीच्या आदेशास मान्यता दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोलापूरातील नादुरुस्त दवाखान्यासाठी पावणे चार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी,बेडची क्षमता 250 ने वाढणार
- ‘…तर भाजपा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करेल’; चंद्रकांतदादांचा सत्ताधाऱ्यांना इशारा
- टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका; पडळकरांचा आदित्य ठाकरेंना टोला
- ‘पवारांचे बस्तान बसविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आडून सोलापूर जिल्ह्याचा दिला जातोय बळी’
- मलिक, राऊत आणि आव्हाड महाराष्ट्राच्या जनतेची आणि मोदींची माफी मागतील का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
