मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 3 डिसेंबरला झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीव्दारे सुरू असलेली शिक्षक सेवक पदभरती प्रक्रिया वगळण्यात आली आहे, असा शासन निर्णय राज्य शासनाच्या कक्ष अधिकारी कविता तोंडे यांनी सोमवारी जाहीर केला आहे. त्यामुळे ‘पवित्र’ शिक्षक भरती पुन्हा होणार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील यासंदर्भात माहिती दिली आहे. गायकवाड यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पवित्र पोर्टलद्वारे उर्वरीत सुमारे 6 हजार पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होत आहे, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1336206442521448457?s=20
गेल्या 2 वर्षांपासून ही शिक्षक भरती विविध कारणांमुळे थांबली होती. ही भरती लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी राज्यभरातील शिक्षकांकडून करण्यात येत होती. यासाठी राजधानी मुंबईतही आंदोलने झाली. गुरुजींच्या या संघर्षाला आता अखेर यश आलं असून राज्यात लवकरच 6 हजार शिक्षकांची भरती होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून मी आणि जानकर साहेब पवारांना भेटलो, रत्नाकर गुट्टेंनी सांगितलं कारण
- पार्थिव पटेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- …म्हणून मी आणि जानकर साहेब पवारांना भेटलो, रत्नाकर गुट्टेंनी सांगितलं कारण
- धक्कादायक ! प्रसिद्ध अभिनेत्रीची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या…
- कोल्हापूर परिसरात आढळणाऱ्या गव्याचे पुण्यातील कोथरूडमध्ये दर्शन


