Share

जॅकी यांना ‘या’ गोष्टीची आजही मोठी खंत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूडमधील अभिनेता जॅकी श्रॉफ उर्फ ‘जग्गू दादा’ अतिशय लोकप्रिय आहे. जॅकी श्रॉफ यांचे वडिल काकाभाई श्रॉफ हे ज्योतिषी होते. तर आई रिता श्रॉफ याचं खरं नाव हुरून्निसा श्रॉफ या गृहिणी होत्या. ‘जग्गू दादा’ आपल्या आईच्या अगदी जवळ होते. सामान्य माणसालाही आपलासा वाटणारा ‘जग्गू दादा’ खूप भावूक असल्याचं अनेकदा अनुभवलं आहे.

अभिनेता जॅकी श्रॉफ हे जवळपास 33 वर्षे मुंबईतील चाळीत राहिले. मात्र प्रसिद्ध आणि यश मिळाल्यानंतर त्यांच्या पत्नी आणि मुलांनी मोठ्या घरात राहण्याचा आग्रह केला. यानंतर जॅकी यांनी चाळीतलं घर सोडून मोठ्या घरात राहण्याचा आग्रह धरला यानंतर मोठ्या घरात शिफ्ट झाले. घर मोठ झालं आणि सगळ्यांना खोल्या झाल्या. आईची वेगळी खोली झाली. घरं मोठं होतं पण माणसं एकमेकांपासून लांब आहेत, ही बाब अनेकदा जॅकी श्रॉफ यांच्या मनात यायची. जॅकी श्रॉफची आई गेली, तरीही तिच्या मायेची ऊब तो नेहमी सोबत ठेवतोय.

जॅकी श्रॉफ यांच्या खोलीच्या अगदी बाजूची खोली त्यांच्या आईची होती. एक दिवस रात्री जॅकी श्रॉफ यांच्या आईचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. जॅकी श्रॉफ यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. रात्री आईने आपल्याला त्रास होत असेल तर आवाज दिला असणार. पण या वेगळ्या खोल्या असल्यामुळे आपल्याला तिचा आवाज आला नसेल. त्यामुळे घरं मोठं झालं, वेगळ्या खोल्या झाल्या मात्र आई माझ्यापासून दुरावली ही गोष्ट आजही जॅकी श्रॉफ यांना सतावत आहे. जॅकी श्रॉफ यांनी ही खंत एका मुलाखतीत बोलून दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!