🕒 1 min read
मुंबई : अन्वय नाईक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. अर्णव गोस्वामींसह इतर दोन जणांना जामीन देण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने प्रत्येकी ५० हजारांच्या जातमुचलक्यावर तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र, अर्णवच्या सुटकेवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अर्णव गोस्वामीच्या सुटके नंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच सदर प्रकरणावर स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराने देखील खोचक ट्विट केले होते. यानंतर वकील रिझवान सिद्दीकी यांनी देशाच्या अॅटर्नी जनरल यांनी पत्र लिहीत अवमानना खटला दाखल करण्याची मागणी केली आहे.
The pace at which the Supreme Court operates in matters of “National Interests” it’s time we replace Mahatma Gandhi’s photo with Harish Salve’s photo…
— Kunal Kamra (@kunalkamra88) November 11, 2020
कुणाल ट्विटमध्ये म्हणाला, ‘ज्या वेगाने सर्वोच्च न्यायालयाने या ‘राष्ट्रीय चर्चित’ मुद्द्यावर सुनावणी केली, त्यावरून आता महात्मा गांधींचा फोटो हरीश साळवेंच्या फोटोशी बदलण्याची वेळ आहे’, या ट्विट वरून आता कुणाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अर्णवच्या सुटकेनंतर कुणाल कामराने सोशल मीडियावर मार्मिक टीका केली होती. या ट्विटमुळे आता कुणाल कामरा वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- तैमूर लवकरच होणार मोठा भाऊ, सैफिनाच्या घरी येतोय छोटा पाहुणा!
- ‘मी नाराज असल्याच्या चर्चा व्यर्थ, पण…’
- बनावट डिझेल प्रकरण; मुख्य सुत्रधार देशमुखला अखेर अटक, आणखी आरोपी वाढण्याची शक्यता!
- तोंडाला मास्क लावा, नाही तर शंभर रुपये खिशात ठेवा!
- गेल्या वर्षभरात एक रुपयाचा निधी पारनेर शहराला मिळाला का?- विजय औटींची आमदार लंकेवर सडकून टीका!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

