Share

तोंडाला मास्क लावा, नाही तर शंभर रुपये खिशात ठेवा!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- नगर जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने नागरिक कोणतीही काळजी घेताना दिसत नाहीत. सध्या दीपावलीच्या खरेदीसाठी नगर शहरात व प्रत्येक तालुका पातळीवर मोठी गर्दी होत आहे.

त्यामुळेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी पोलिसांना दिले आहेत. तसा आदेश डॉ.भोसले यांनी काढला आहे. सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडणे, मास्क न वापरणाऱ्या लोकांकडून शंभर रुपये दंड वसुल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रोज दीडशे रुग्ण सापडू लागले होते. ते आता अडीचशेच्या दरम्यान जाऊ लागले आहेत. हळूहळू कोरोना वाढतो आहे. नगर तालुक्यातील अकोळनेरमध्ये तर एकाच दिवशी ४४ रुग्ण आढळून आले होते. संगमनेर शहरातही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने नागरिक कोणतीही काळजी घेताना दिसत नाहीत. दिवाळीमुळे बाजारपेठेत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कोणीही शासकीय नियमांचे पालन करीत नाही. मास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्सिंगचे न पाळणाऱ्यांवर आता पोलिस दंडात्मक कारवाई करणार आहेत.

जिल्हाधिकारी डाॅ.भोसले यांनी पोलिसांना अधिकार दिले असून, कोणीही विनामास्कचा आढळल्यास त्याच्याकडून लगेचच शंभर रुपये दंड वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे दहा रुपयांचे मास्क तोंडाला लावलेले केव्हाही बरे, असेच म्हणण्याची वेळ आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कमी होणारा रुग्णांचा आकडा काही दिवस दोनशेच्या दरम्यान स्थिर होता. आता मात्र तो वाढू लागला आहे. त्यामुळे नगरकरांनी काळजी घेण्याशिवाय पर्याय नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!