Share

बनावट डिझेल प्रकरण; मुख्य सुत्रधार देशमुखला अखेर अटक, आणखी आरोपी वाढण्याची शक्यता!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- शहरांमध्ये बनावट डिझेलचा टँकर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस पकडण्यात आला होता. या कारवाईला पंधरा दिवसांचा कालावधी उलटला असतानाही मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आलेली नव्हती. आता शहरातील बनावट डिझेल प्रकरणी मुख्य सुत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे.

बनावट डिझेल प्रकरणात बुधवारी रात्री डिझेल रॅकेटमधील मुख्य सूत्रधार शब्बीर देशमुख व त्याचा मुलगा मुदस्सर देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने राहता तालुक्यातील लोणी परिसरातून या दोघांना रात्री अटक केली आहे.

नगर जिल्ह्यातील बनावट डिझेल व नाफ्ता भेसळ रॅकेटचा योग्य दिशेने तपास करून मुख्य आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली होती. राजकीय मंत्र्याच्या दबाव असल्यामुळे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हाती लागत नसल्याचा आरोप कर्डीले यांनी केला होता. त्यामुळे पोलीस कारवाईत हस्तक्षेप करणारा ‘तो’ मंत्री कोण? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती.

दरम्यान डिझेल रॅकेटचा मुख्य सूत्रधार शब्बीर आणि त्याचा मुलगा मुदस्सर असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात आणखीही आरोपी वाढण्याची शक्यता आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नगर शहरातील जीपीओ चौकात तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.दत्ताराम राठोड यांच्या पथकाने छापा टाकून सुमारे दोन हजार लीटर बनावट डिझेल जप्त केले होते.

अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी उपाधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे हा तपास वर्ग केला होता. तपास वर्ग झाल्यानंतर अवघ्या चार दिवसातच मिटके यांनी मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!