Share

गेल्या वर्षभरात एक रुपयाचा निधी पारनेर शहराला मिळाला का?- विजय औटींची आमदार लंकेवर सडकून टीका!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- पारनेर नगरपंचायत निवडणूकीसाठी दोन दिवसांपूर्वी प्रभागनिहाय आरक्षण सोडत डॉ.आंबेडकर भवन पारनेर येथे उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी डॉ.सुनीता कुमावत यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.

नगरपंचायतीच्या निवडणुकीला अद्याप अवकाश असला तरी आतापासूनच राजकीय वातावरण तापले आहे. आपण पारनेर शहराचा केलेला बदल जनतेपुढे आहे. बाहेरचे लोक येथे येऊन १७-० करण्याच्या वल्गना करतात. त्यांचा काय संबंध? गेल्या वर्षभरात त्यांचा एक रुपयाचा निधी पारनेर शहराला मिळाला का? असा सवाल माजी आमदार विजय औटी यांनी आमदार निलेश लंके यांना केला आहे.

निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच दोघांनीही १७-० करण्याचा नारा दिला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे शिवसेना, राष्ट्रवादी हे दोन्ही घटक पक्ष सरकारमध्ये सामील असले तरी पारनेरमध्ये मात्र सेना, राष्ट्रवादी अशीच लढत रंगणार आहे. या दोघांनीही उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे तर काही प्रभागातील उमेदवार देखील निश्चित झाल्याची माहिती समजते.

निवडक कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी म्हणाले की, आपण पारनेर शहराचा केलेला बदल जनतेपुढे आहे. या निवडणुकीत आपण सर्व १७ जागा जिंकू असा विश्वास औटी यांनी बैठकीत बोलताना व्यक्त केला. गेल्या वर्षभरात त्यांचा एक रुपयाचा निधी पारनेर शहराला मिळाला का? असा सवालही माजी आमदार औटी यांनी केला.

दरम्यान अद्याप निवडणूक जाहीर झाली नसताना राजकीय फटाके फोडण्यास सुरूवात झाली आहे. यावरूनच ही निवडणूक प्रतिष्ठेची, अटीतटीची होणार यात शंकाच नाही. उमेदवारांपेक्षा माजी आमदार औटी व आमदार लंके यांच्या भोवतीच या निवडणुकीचा केंद्रबिंदू राहणार असल्याचे दिसते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!