मुंबई : आषाढी एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या बसमधून पंढरपूरजवळ वाखरी इथं दाखल झाल्या आहेत. एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्क्मिनीची शासकीय पूजा करण्यात येत असती. पूजा करण्यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह सोमवारीच पंढरपूरला रवाना होणार आहे. विशेष म्हणजे ते स्वत: गाडी चालवित पंढरपुरात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मु्ंबईतून स्वतः गाडी चालवत पंढरपूरात दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. भाजपासह इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आता मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर प्रवासावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजापचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यानंतर आता रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.
‘उठा उठा आषाढी आली, ‘स्वबळावर’ गाडी चावलत पंढरीला जायची वेळ झाली’, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी यावेळी ‘माझे कुटुंब हाच महाराष्ट्र’ असा हॅशटॅग देखील त्यांनी वापरला आहे. दरम्यान खराब हवामानामुळे विमानानं पंढरपूरला जाणं शक्य नसल्यानं मुख्यमंत्री ठाकरे यांनी रस्ते मार्गानंच प्रवास करण्याचा निर्णय घेतला. स्वत: ड्रायव्हिंग करत ते पंढरपूरकडे निघाले आहेत. मुसळधार पावसामुळे नेहमीची मर्सिडिज गाडी ऐवजी ते रेंज रोव्हर कार घेऊन रवाना झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्य चालवता न आलेल्या माणसाने गाडी चालवली यात काय मोठा पराक्रम?’ निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
- ‘आमची मुंबई’चे ढोल बडवणारे सेलेब्रिटी आता कोणत्या बिळात लपले?’
- रेल्वेची धडक तिकीट तपासणी मोहीम, पाचच दिवसात १२८५ फुकट्यांवर कारवाई!
- दुर्दैवी घटना : ठाण्यात दरड कोसळून ३ वर्षांच्या चिमुरडीसह ५ जण ठार
- ग्रामीण भागात शाळा सुरु मात्र अजूनही शिक्षकांचे लसीकरण नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

