🕒 1 min read
नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी दिल्लीत त्यांच्या घरी डिनरचं आयोजन केले होते. वाढदिवसानामित्त आयोजित या डिनर पार्टीत अनेक राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊतदेखील उपस्थित होते. या बैठकीत राजकीय हेतूने अनेक चर्चा झाल्या. यावेळी काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेससंबंधी आणि विरोधकांच्या पुढील वाटचालीसंबंधी भाष्य केले आहे.
विरोधकांनी एकमेकांशी बोलण्याची वेळ आली आहे. आम्ही काँग्रेसमन असून काँग्रेसला या चर्चेतून वगळलेलं नाही. राहुल गांधी पुढाकार घेत असून हा डिनर गांधींसाठी आणि गांधीसोबतच होता, असे विधान सिब्बल यांनी केले आहे.
कपिल सिब्बल यांना यावेळी गांधींशिवाय विरोधकांना एकत्र आणलं जात आहे का? असा सवाल देखील करण्यात आला. यावेळी त्यांनी याचं गांधींशी काही देणंघेणं नाही. या देशातील लोक आम्हाला प्रश्न विचारत आहेत ते ठीक आहे. आम्ही भाजपाविरोधा नाही. मला वाटतं प्रक्रिया सुरु करण्याची वेळ आली आहे. बहुजन समाज पार्टी वगळता सर्वजण तिथे उपस्थित होते. चर्चा सुरु करणं हा माझा मुख्य हेतू होता. असे वक्तव्य त्यांनी केले आहे. आम्हाला काँग्रेसला मजबूत करायचं आहे. देशातील लोकांना भाजपा नको असून आम्हाला त्यांना पर्याय द्यायचा आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
- क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला तरी, रोहित-विराट राहणार पदकापासुन वंचित
- भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मोईन अलीचे संघात पुनरागमन
- महाराष्ट्रात आज ५,६०९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर…
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
- ‘MPSC आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती’; प्रीतम मुंडे लोकसभेत कडाडल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
