Share

क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला तरी, रोहित-विराट राहणार पदकापासुन वंचित

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने दैदीप्यमान कामगीरी केली. ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताने या स्पर्धेत सर्वात जास्त म्हणजे ७ पदके पटकावली. यात एक सुवर्णपदक, दोन रौप्य आणि चार कांस्यपदक आहेत.

ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताच्या दैदीप्यमान यशानंतर पुन्हा क्रिकेटचा समावेश खेळाच्या या महाकुंभात करण्यात यावा अशी मागणी क्रिकेट प्रेमी करत आहेत. यादरम्यान आयसीसीने २०२८ लॉस एन्जेलिस ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव ठेवला आहे. आयसीसीच्या या निर्णयाला बीसीसीआयनेही पाठिंबा दाखवला आहे. आयसीसीचा हा प्रयत्न जर यशस्वी झाला तर स्पर्धेत भारतीय संघ सहभाग घेईल असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

भारतीय क्रिकेट संघ जर ऑलिम्पिकमध्ये गेला तर पदक निश्चीत घेऊन येईल अशी खात्री भारतीय क्रिकेट रसिकांना आहे. मात्र जरी असे घडले तरी भारतीय क्रिकेटचे सध्याचे हिरो विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही पदकापासुन वंचित राहतील. कारण २०२८ पर्यंत विराटचे वय ३९ आणि रोहितचे वय ४१ असेल त्यामुळे तोपर्यंत ते क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असेल. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू ऑलिम्पिक पदकापासुन वंचित राहतील.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!