🕒 1 min read
पुणे : पहिल्या ४ टी-२० सामन्यात केएल राहुलने डावाची सुरुवात केली होती. परंतु त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे ५ व्या टी -२० सामन्यात त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. फ्लॉप परफॉरमन्समुळे त्याच्या बॅटिंगवर अनेक दिग्गजांनी तसंच क्रिकेट रसिकांनीही टीका केली. याच टीकाकारांना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने गाण्याच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. लोग कहेंगे, लोगों का कहेना काम हैं, असं म्हणत त्याने के.एल. राहुलसाठी जोरदार बॅटिंग केली आहे.
जेव्हा एखादा फलंदाज आऊट ऑफ फॉर्म असतो तेव्हा त्याच्यावर अनेक जण टीका करत असतात. त्याची मजा घेत असतात. पण अशावेळी लोकांना कसं रिअॅक्ट करायचं हे एक खेळाडू म्हणून आम्हाला माहिती असतं. शेवटी खेळाडूंच्या वाईट काळात त्यांच्यासोबत आपण उभं राहिलं पाहिजे. त्यांना साथ दिली पाहिजे, असं विराट म्हणाला.
के.एल.राहुलसाठी बॅटिंग करताना विराट कोहलीला राजेश खन्ना यांच्या अमर प्रेम चित्रपटातील एका गाण्याची आठवण झाली. खेळाडूंच्या वाईट काळात त्यांना साथ दिली पाहिजे हे सांगताना “कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहेना, बेकार की बातों में कहीं बीत ना जाये रैना…”, या गीताच्या ओळी विराटने गुणगुणल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- फेरफारासाठी लाच स्वीकारणारा मंडळ अधिकारी, सरपंच अटकेत
- जनता कर्फ्यूची वर्षपूर्ती; हे मिम्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही !
- ‘दिल्लीतील बैठका म्हणजे १०० कोटीच्या हिस्सेदारांची चाललेली धावपळ’
- तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्यावर ताहिरा कश्यपचं बिकिनी परिधान करून चोख उत्त्तर…..
- अखेर बेन स्टोक्सने सांगितले इंग्लंडच्या पराभवाचे कारण…


