मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच यावेळी त्यांनी राज्यातील मदरशांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (PM Narendra Modi) केली. त्यामुळेच राज यांनी घेतलेली भूमिका मुस्लीमविरोधी असून त्यांना दंगली घडवायच्या आहेत असे आरोप केले जात आहे. दरम्यान, या आरोपांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी उत्तर दिले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अविनाश जाधव म्हणाले की,‘आम्ही दोनच गोष्टी मानतो पुरुष आणि महिला. पण केवळ भोंगे उतरवावे यावरुन एवढं राजकारण होत असेल तर नक्कीच मला असं वाटतं की शर्मेची गोष्ट आहे.’ तसेच भोंगे काढा असं बोलल्यानंतर दंगल व्हावी अशी काय परिस्थिती आलीय? ही दंगल वगैरे सगळ्या राष्ट्रवादीला हव्या असलेल्या गोष्टी आहेत, असेही जाधव म्हणाले.
दरम्यान, पुढे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेवर उत्तर देत जाधव म्हणाले की,‘जितेंद्र आव्हाड यांना एक गोष्ट नक्की माहिती आहे की राज ठाकरेंच्या बाबतीत बोललो की त्यांना प्रसिद्धी मिळते. मुंब्र्यामधील लोक वाह वाह करतात आणि म्हणूनच ते पुढे येतात. तीन तीन वेळा बोलायची काय गरज आहे.’ तसेच जितेंद्र आव्हाडांना भोंगा, मशीद, मुस्लमान अशा गोष्टी ऐकायला आल्या की त्यांच्या अंगात देव संचारतो. ते भडभड बोलायला सुरुवात करतात, असेही जाधव यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “शरद पवार जरी मित्र असले, तरी ती नि** प्रवृत्ती आहे”, शिवसेनेची जुनी फेसबुक पोस्ट व्हायरल
- IPL 2022 LSG vs SRH : हैदराबादचा भुवनेश्ववर कुमार बनला सुपरमॅन, पण….; पाहा नेमके काय घडले!
- “समृद्धी महामार्ग ही माझीच संकल्पना, काहीही केलं तरी…”, देवेंद्र फडणवीसांचा इशारा
- महागाई आणि बेरोजगारीचे काय? नाना पटोलेंचा केंद्राला सवाल
- “महाराष्ट्र पेटवू नका”, जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंना विनंती


