Share

IPL 2022 LSG vs SRH : हैदराबादचा भुवनेश्ववर कुमार बनला सुपरमॅन, पण….; पाहा नेमके काय घडले!

Published On: 

मुंबई: सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार त्याच्या धारदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो. भुवनेश्वर कुमार हा स्विंग बॉलिंगचा मास्टर देखील मानला जातो. त्याच्या लहरी गोलंदाजीसमोर धावा काढणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नसते. लखनऊ विरुद्ध सामन्यात मात्र भुवीने एक वेगळी करामात केली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

झाले असे की, LSG vs SRH यांच्यातील सामन्याचे १० वे षटक टाकले जात होते. क्षेत्ररक्षणादरम्यान वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (bhuvneshwar kumar) थर्ड मॅनच्या बाउंड्री लाइनवर उभा होता. लखनऊचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि दीपक हुडा (deepak hooda) क्रीझवर फलंदाजीसाठी उपस्थित होते. या षटकात विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले. हुडा मोठे फटके लगावण्यासाठी ओळखले जातो. त्यामुळे त्याने उमरान मलिक (umran malik) १०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर थर्ड मॅनच्या दिशेने शॉट मारला. जिथे भुवनेश्वर कुमार उभा होता.

https://twitter.com/Peep00470121/status/1510996780347183107?s=20&t=FYjg5-3fIHtvWrlfXzzwug

भुवनेश्वर कुमारने हवेत उसळत झेल घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र चेंडू त्याच्या हातातून पडल्याने तो सीमारेषेच्या पुढे गेला. क्षणभर दीपक हुडाचे काम झाले असे वाटले, पण झेल सुटल्याने हुडाने सुटकेचा नि:श्वास सोडला. भुवी तो झेल पूर्ण करू शकला नाही मात्र त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!