नवी दिल्ली :– केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.
9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
दरम्यान,राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यानिमित्ताने सरकारवर टीका केली आहे. दर दिवसाला शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. एखाद्या डाकू प्रमाने केंद्र सरकारची भूमिका आहे. या केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी लुटला जात आहे, अशी टीका कडू यांनी केली आहे.
लॉकडाउनच्या काळात न दिसणाऱ्या कोरोना विषाणूमुळे आपण बंद ठेवला. मात्र, आता हा शेतकऱ्यांवर दिसणारा अतिरेक अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांवर अन्याय आहे, जसा एखादा डाकू यावा आणि त्याने पोटात चाकू खुपसून सर्व माल ओरबाडून न्यावा असं हे मोदी सरकारचे धोरण आहे, अशी टीका बच्चू कडूंनी केली
दरम्यान, आजच्या भारत बंदनंतर उद्या सरकारसोबत चर्चेची सहावी फेरी पार पडणार आहे. त्यापूर्वीच अमित शाह यांनी शेतकरी नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीतून तोडगा निघणार का?, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधीनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- ‘माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच’, हेमंत ढोमेंचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा
- व्यापाऱ्यांवर वेळ येईल तेव्हा त्यांना त्यांची जागा दाखवू- अंकुश काकडे
- भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष – नवाब मलिक
- दिलदार शेतकऱ्यांचा मोठेपणा; आंदोलनात करून दिली रुग्णवाहिकेला वाट!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

