मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. सध्या राज्यात वीकेंड लॉकडाऊनसह कडक निर्बंध लागू करण्यात आले असून राज्यात संपूर्ण लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज निर्णय घेण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधत आहेत. दरम्यान, मागील संवादावेळीच उद्धव ठाकरे यांनी जनतेला लॉकडाऊनचा इशारा दिला होता. उद्धव ठाकरेंच्या संबोधनाला सुरुवात झाली असून त्यांनी सुरुवातीला जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोना हाहाकाराला सुरुवात झाली असता मधल्या काळात त्याला आटोक्यात आणलं. यासाठी शासकीय यंत्रणेचं मी अभिनंदन करतो. मागील गुढीपाडव्याच्या वेळी पुढील वर्षी कोरोनाच युद्ध संपेल असं वाटलं होत. आता या युद्धाला पुन्हा सुरुवात झाली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
पहा उद्धव ठाकरे यांचे संबोधन –
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/202573548021456/
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन बाबतच्या निर्णयाआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध नेत्यांसह अधिकाऱ्यांसोबत देखील बैठकीचा सपाटा लावला होता. सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठक, राज्याचे मुख्य सचिव सचिन कुंटे यांच्यासोबत बैठका पार पडल्या आहेत. राज्यात आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासोबतच कोरोना प्रतिबंधाला आळा घालण्याबाबत उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना उपाययोजनांबाबत केंद्राकडून ठाकरे सरकारवर पुन्हा नाराजी
- NIAच्या IG शुक्लांची तडकाफडकी बदली का केली ?; मुश्रीफांचा सवाल
- …तेव्हा पक्षापेक्षा शेतकरी महत्वाचा असतो; बच्चू कडूंनी सांगितली भारतनानांची आठवण
- पवारांचा रुग्णालयात गुढीपाडवा; अजितदादांनी घेतली भेट, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
- लवकरच मी फिल्डवर ॲक्टिव्ह होईन ; कोरोन संसर्गानंतर आदित्य ठाकरेंचा विश्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

