पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे ऱ्हदयद्रावक घटना घडली आहे. १५ प्रवाशांनी घेऊन जाणारी जीप गंगा नदीत कोसळली. यात १० प्रवाशांचा मृत्यू झाला. तर इतर पाच प्रवाशांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे गंगा नदी परिसरात मोठी गर्दी झाली होती.
१५ प्रवाशांनी खच्चून भरलेली ही जीप पीपापूल येथे अचानक गंगा नदीत कोसळली. यातील दहा प्रवाशांचे मृतदेह सापडले आहेत. तर अन्य लोकांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनूसार, ज्याठिकाणी ही घटना घडली तिथे चढ आहे. त्याच जागी पुल जीर्णदेखील झाला आहे. याच कारणामुळे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर अजूनही काही जण बेपत्ता आहेत. स्थानिक लोक या बेपत्ता प्रवाशांचा शोध घेत आहेत. प्रशासनही घटनास्थळी दाखल झालं आहे.
Bihar: A jeep, carrying at least 15 passengers, fell into river Ganga at Peepapul in Patna today; at least 10 people missing. Search operation for the missing peole is underway. pic.twitter.com/wObcjXFYQM
— ANI (@ANI) April 23, 2021
ही घटना पीपा पुलाची निर्मिती करणाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचं बोललं जात आहे. या पुलाचं काम चुकीच्या पद्धतीनं झालं आहे. या पुलाचं काम चुकीच्या पद्धतीनं झाल्यानं बऱ्याचदा इथे अनेक गाड्या घसरल्याच्या घटना घडल्या आहेत. याठिकाणी अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत. आजदेखील रेलिंग तोडून प्रवाशांनी भरलेली जीप गंगा नदीमध्ये कोसळली. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीमही घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांसमोर केजरीवालांना फटकारले, म्हणाले..
- अंडरवर्ल्डशी संबंध? पोलीस महासंचालकाकडून परमबीर सिंहांची चौकशी
- शासनाने जाहीर केलेली मदत आठ दिवसात पोहोचवणार – हसन मुश्रीफ
- रेमडिसीवीर नंतर औरंगाबादेत आता ‘या’ इंजेक्शनचा तुटवडा
- मदतीचा हात ! पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दोन महिने मोफत धान्य मिळणार


