Share

‘काँग्रेसला ७० वर्षे लागली पेट्रोलचे दर ७० रुपयांवर नेण्यासाठी पण, ७ वर्षातच दर १२० रुपये केले’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. यातच आता आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये प्रत्येकी 35 पैशांची वाढ करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात आधीच सर्व महागळे असताना दिवसेंदिवस इंधनात होणारी वाढ चिंताजनक आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीनंतर एलपीजी गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसमणी नागरिक त्रस्त झाले आहे.

काँग्रेस नेते श्रीनिवास बीवी यांनीही देशातील वाढती महागाई आणि पेट्रोल-डिझेल गॅस दरवाढीविरोधात मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसला जवळपास 70 वर्षे लागली होती, पेट्रोलचे दर 70 रुपयांवर नेण्यासाठी. पण, राष्ट्रवादी आणि संघी लोकांनी 7 वर्षातच 120 रुपयांवर नेऊन ठेवले आहेत. मग हा कसला राष्ट्रवाद? असा सवालही श्रीनिवास यांनी विचारला आहे. तसेच, विदेशी राष्ट्राध्यक्षांच्या जबरदस्तीने गळ्यात पडणाऱ्या पंतप्रधानांनी देशातील गरिबांना सर्वात शेवटी कधी गळाभेट दिली होती, कधी त्यांचं दु:ख ऐकून घेतलं होतं? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

देशाच्या अनेक शहरांमध्ये यावेळी पेट्रोल दर 120 लीटरच्या जवळपास पोहोचला आहे. देशातील बहुतांश ठिकाणी पेट्रोल १०० प्रति लिटरच्या पुढे विकले जात आहे. कोरोना काळामुळे अनेकांना चांगलाच फटका बसला आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झालेत. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्यात. या सगळ्यातून सर्वसामान्य सावरतो तोच महागाईचा भडका उडाला. यातच महिन्याच्या आणि दिवाळीच्या पहिल्याच दिवशी गॅस दरवाढीच्या बातमीने सर्वांवर मोठा बॉम्ब फुटला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आता 265 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!