Share

‘सोशल मिडियावर एखाद्याला शिवीगाळ करणं… ट्रोल करणं… खाजगी आयुष्यात डोकावणं चुकीचं’

Published On: 

मुंबई – कोरोना संकटकाळात टेक्नॉलॉजी मदतीला आली परंतु याच टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सोशल मिडियावर एखाद्याला शिवीगाळ करणं… ट्रोल करणं… एखाद्याच्या खाजगी आयुष्यात डोकावणं याचा गैरवापर केला गेला. हे केलं जात असेल तर सुसंस्कृत समाजाला… देशाला चांगलं नाही त्यामुळे समाजात चुकीचं काही घडत असेल तर माझी नैतिक जबाबदारी आहे की मी यावर आवाज उठवला पाहिजे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डोंबिवलीतील इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांशी बोलताना व्यक्त केले.

प्रेसवर नियंत्रण आणायचं आहे असं माझं अजिबात मत नाही. एकमेकांवर टीका करा ती केली पाहिजे. आम्ही सत्तेत आहोत म्हणून जरुर करा परंतु शिवीगाळ होणार असेल तर मात्र आवाज उठवला गेला पाहिजे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो महाराष्ट्र व भारत अपेक्षित होता तो या लोकशाहीत आपलं वागणं बसतं का? तर ते नाही बसत त्यामुळे या गोष्टीचा विचार नवीन पिढीने केला पाहिजे असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुळे यांनी डोंबिवली येथील जोंधळे इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी केंद्र सरकारचे शैक्षणिक धोरण आणि येणारं शैक्षणिक धोरण याबद्दल काय वाटते व टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया आणि न्यूज यामध्ये पुढे काय धोरण असले पाहिजे, सेक्स एज्युकेशन यासह अन्य विषयांवर झूमद्वारे संवाद साधला.

यावेळी बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ड्रग्जबाबत बोलताना ड्रग्ज थांबवण्यासाठी, मुलं का ड्रग्ज घेत आहेत यासाठी प्रयत्न करा परंतु ड्रग्जबाबत जे काही टिव्हीवर दाखवलं जात आहे. अभिनेत्रींची गाडी फॉलो केली जाते. ते अगदी तिने कोणता ड्रेस घातला आहे इथपर्यंत दाखवलं जात आहे. अरे ड्रग्ज मुलं का घेतात. ते थांबवण्यासाठी प्रयत्न करा ना. एखाद्याच्या खाजगी आयुष्यात घुसून दाखवलं जातं हे ऐकायला नाही आवडत मला. यात मला इंटरेस्ट नाही. टिव्हीवर दाखवलं जाणारं हे मुलांना तरी आवडतं का? असा सवालही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुलांना केला.

यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी बजाजचे मॅनेजिंग डायरेक्टर राजीव बजाज यांनी अफवा पसरवण्यासाठी ज्या एजन्सी किंवा वृत्तपत्र आणि चॅनल काम करत आहेत त्यांना जाहीरात न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले.या संवादात विद्यार्थी प्रणय काते, पुनम निमजे, अर्चित पुरंदरे, निखिल बागुळ यांच्यासह अनेक विद्यार्थी आणि संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जोंधळे यांनी सहभाग घेत आपले विचार मांडले.

महत्वाच्या बातम्या-

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!