🕒 1 min read
नवी दिल्ली- जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुला यांनी रविवारी केलेल्या वादग्रस्त विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एलएसीवर जे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे, त्यास केंद्र सरकार जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. तर जम्मू-कश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्याचा जो निर्णय घेतला, त्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
“कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय चीन कधीही मान्य करणार नाही. चीनच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू होईल”, अशी अपेक्षा फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केली. इंडिया टुडेशी बोलताना फारुख अब्दुल्ला यांनी हे वादग्रस्त विधान केले.
फारूक अब्दुला म्हणाले की, मी चीनच्या राष्ट्रपतींना काश्मीरमध्ये बोलवले नव्हते. पंतप्रधान मोदीच त्यांना गुजरातला घेऊन गेले होते. तिथे त्यांना पाळण्यात बसविले. त्यानंतर त्यांना चेन्नईला घेऊन गेले. तिथेही त्यांना खूप फिरवलं. मात्र जेव्हा अनुच्छेद ३७० काढलं तेव्हा चीनने नाराजी व्यक्त केली होती असं ते म्हणाले.
पुढे बोलताना अब्दुला म्हणाले, मोदी सरकारने ५ जुलै २०१९ रोजी संविधानात तरतूद करत जम्मू आणि काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेतला. पाकिस्तान आणि चीनने देखील या गोष्टीचा विरोध केलेला आहे. मात्र भारताने आमच्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ न करण्याचा इशारा दिला.
महत्वाच्या बातम्या-
- बिहार निवडणूक : कॉंग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातून केवळ ‘या नेत्याला मिळाले स्थान
- मोदी यांच्या हस्ते स्वामित्व योजनेचा प्रारंभ, एक लाख लोकांना मिळकत प्रमाणपत्रांचं वितरण
- रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा – पडळकर
- भारतात गांजा कायदेशीर झालाच पाहिजे ; अभिनेता रणवीर शौरीचे वादग्रस्त वक्तव्य
- परळी झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी ६००० घरकुले बांधणार ; धनंजय मुंडेंचा संकल्प
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
