भोपाळ : मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. या कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेसने खेती बचाओ यात्रा सुरु केली आहे. कृषी विधेयकं राज्यसभेत मंजूर झाल्यापासून काँग्रेसने या कायद्यास जोरदार विरोध केला होता. तर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील या विधेयकांना मंजुरी देऊन कायदायत रूपांतर केल्याने काँग्रेसने देशभरात आंदोलन उभारलं आहे.
काँग्रेसच्या या आंदोलनावर भाजपसह मित्रपक्षांनी टीका केली असून हे विधेयक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असून दलालांना चाप बसवणारे आहे असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या दोघांनी जर एखाद्या पिकाच्या पनावरुन ते पीक कोणतं आहे हे ओळखल्यास मी राजकारण सोडेन असं आव्हान त्यांनी दिलं आहे. गांधी परिवाराकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
शेखावत म्हणाले, “राहुल आणि प्रियंका गांधी यांना शेळ्यामेंढ्यामधला फरक कळणार नाही. तसेच जर या बहिणभावाने शेतातील पीकाच्या पानांवरुन ते कशाच पीक आहे हे ओळखल्यास आपण राजकारण सोडून देऊ.”
महत्वाच्या बातम्या-
- चीनच्या मदतीने पुन्हा कश्मीरात 370 लागू करू, फारुख अब्दुला यांचे विषारी फुत्कार
- मोदी यांच्या हस्ते स्वामित्व योजनेचा प्रारंभ, एक लाख लोकांना मिळकत प्रमाणपत्रांचं वितरण
- रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा – पडळकर
- भारतात गांजा कायदेशीर झालाच पाहिजे ; अभिनेता रणवीर शौरीचे वादग्रस्त वक्तव्य
- परळी झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी ६००० घरकुले बांधणार ; धनंजय मुंडेंचा संकल्प


