मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने आज फेटाळला. तसेच या प्रकरणातील संशयित आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आर्यन खानच्या जामिनावर प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. आजही एनडीपीएस न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केलेला नाही. बुधवारी एनसीबीने कोर्टात आर्यनच्या अशा काही चॅट सादर केले आहेत, जे ड्रग्ज विषयी होते. सध्या तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.
ड्र्ग्ज केस प्रकरणात आर्यन खानचे नाव समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करत मोठे गौप्यस्फोट केले होते. तर दुसरीकडे शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी आर्यनला जामीन मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर आता भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
‘एकीकडे युवा पिढी अमली पदार्थाच्या व्यसनाकडे जात असताना ते थांबवण्याचा प्रयत्न करण्याचे काम आपण सगळ्यांनी करायचे असते. पण एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे कौतुक दूर राहिले. याउलट एनसीबी यंत्रणा आणि त्यांचे अधिकारी कसे दोषी आहेत, अशा संशयाच्या भोवऱ्यात त्यांना उभे करायचे, हे तपास यंत्रणा म्हणून योग्य नाही, या शब्दांत दरेकरांनी टीकास्त्र सोडले आहे. ‘ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे कौतुक करायचे लांब राहिले, त्यांना राज्य सरकारकडून दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही सुरू आहे. शिवसेना नेते आर्यन खानच्या सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात गेले आहे, हे दुर्दैवी आहे’, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चंद्रकांत पाटील कर्तबगार, निष्कलंक, छळकपट, विश्वासघात न करणारे नेते’; भाजप नेत्याचे स्तुतीसुमने
- ‘मराठवाड्याने कोकणातील १६८ टीएमसी पाणी विसरावे, याकरिता जयंत पाटलांकडून १९ टीएमसीचे गाजर’
- ‘लोकांना सिनेमा आणि नाट्यगृहापर्यंत पुन्हा कसे आणायचे हे मोठे आव्हान’, संजय राऊतांनी व्यक्त केली चिंता
- हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा; नारायण राणेंचे मुख्यमंत्र्यांना प्रहारमधून आव्हान
- अभिनेत्रीच्या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

