अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- स्थायी समितीच्या सभापती पदासाठी मनोज कोतकर यांचे नाव भाजपकडून अंतिम असल्याचे सांगण्यात येत असतानाच मनोज कोतकर यांनीच राष्ट्रवादीत काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. नंतर त्यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड देखील झाली. मनोज कोतकर यांच्यावर कारवाईसाठी अद्याप भाजपला मुहूर्त सापडलेला नाही. कोतकर यांनीही भाजपच्या नोटीसला उत्तर देणे महत्त्वाचे मानले नसल्याने पक्षातील बहुचर्चित शिस्तीचे वाभाडे निघाले आहेत.
महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक नुकतीच झाली. भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीकडून सभापती झाल्यानंतर कोतकर यांनी आजपर्यंत त्यांचा पक्ष कोणता हे सांगितलेले नाही. मात्र कोतकर राष्ट्रवादीचे असल्याचा दावा आ.संग्राम जगताप करतात, तर महापौर बाबासाहेब वाकळे म्हणतात कोतकर भाजपचेच आहेत.
या सर्व गोंधळात भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड.अभय आगरकर यांनीही कोतकर यांनी पक्ष जाहीर करावा किंवा कारवाईस सामोरे जावे, असे म्हटले आहे. या घटनेला पंधरा दिवस उलटले. भाजपने कोतकर यांना नोटीस देऊन तुमचा पक्ष कोणता ते जाहीर करण्याचे सांगितले आहे. तसेच तसा खुलासा पक्षाकडे करण्यास सांगितले आहे. यासाठी तीन दिवसांचा अवधी त्यांना दिला होता.
मात्र नोटीस देऊन दहा दिवस उलटले तरीही पक्ष पुढील कारवाई करायला तयार नाही. त्यामुळे कोतकर यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत गोंधळ वाढत चालला आहे. भाजप कार्यकारिणीची बैठक घेऊन कोतकर यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी सांगितले. मात्र कार्यकारिणी कधी होणार, याबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही.
महत्वाच्या बातम्या:-
- आज बिस्किट वाटपाचा जाहीर कार्यक्रम : वाघ
- निवडणूक आयोगानं शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ नाकारत ‘बिस्किट’ दिलं
- नियम मोडून एसटी प्रवास करणाऱ्या नवनीत राणांवर कारवाई होणार का?
- राजा सेन म्हणतात, प्रेक्षक सिनेमागृहात येऊ नये म्हणून लढवली शक्कल…
- साक्षात सरस्वतीदेवीकडून कौतुक! सुबोध भावेंची प्रतिक्रिया


