🕒 1 min read
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अशिष मिश्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. काँग्रेसने या प्रकरणाचा तपास निरक्षपाती होण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनामाच्या मागणी केली आहे.
याबाबत काँग्रेसने ट्विट केले आहे. लखीमपूर खेरी हिंसाचारात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देऊन या प्रकरणावर पडदा नाही टाकला जाऊ शकत. त्या शहीद शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हिंदूस्थानचे कर्तव्य आहे. असे ट्विट काँग्रेसने केले आहे.
लखीमपुर खीरी नरसंहार में शहीद हुए किसानों का बलिदान भाजपाई निरंकुशता की भेंट नहीं चढ़ सकता।
उन शहीद किसानों को न्याय दिलाना हिंदुस्तान का कर्तव्य है।#ModiSackAjayMishra pic.twitter.com/OOW4VXFLU2
— Congress (@INCIndia) October 17, 2021
शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात होता. जोपर्यंत दोषींवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृत शेतकऱ्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला होता. शेतकऱ्यांच्या या पावित्र्याला शेतकरी नेते राकेश टिकेत यांनीदेखील पाठिंबा दिला होता.
महत्वाच्या बातम्या
- आत्मविश्वासाने लढा विजय आपलाच; चंद्रकांत पाटलांकडून नगरसेवकांना विश्वास
- भारत-पाकिस्तान सामन्यादिवशी सानिया मिर्झाने सोशल मीडियापासून दूर राहण्याचा घेतला निर्णय
- ‘अजितदादांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का?’
- ‘बकऱ्याला कापायच की जगू द्यायचं, हे बकरा नसतो ठरवत, तो निर्णय कसायाचा असतो’
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
