Share

‘ओबीसींना मागास ठेवण्याचा आरएसएसने विडा उचललाय!’

Published On: 

पुणे : ‘मोदी सरकार ओबीसीद्वेष्टे असल्याने ते ओबीसीच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये बाधा आणत आहे. सरकारचे हे वागणे घटनाविरोधी आहे. ही जनगणना वर्गाची गणना आहे, जातींची नाही हे या तथाकथित विद्वानांना कळत नाही, अशी जणगणना करण्याचा केंद्रीय नियोजन आयोगाने निर्णय घेतला तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींनी त्याला पाठींबा दिला होता. मग आता घुमजाव का?, असा सवाल अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी उपस्थित केला आहे.

हा वर्ग शैक्षणिकदृष्ट्या कुठवर पोहचला आहे याचा धांडोळा जनगणनेद्वारे घेतला जातो. त्याच्या शैक्षणिक विकासासाठी आणखी कोणत्या योजना आणि कार्यक्रम आखायला हवेत हे ठरवण्यासाठी त्याची सद्यस्थिती कळणे गरजेचे आहे. जनगणनेत ही माहिती जमा न करणे म्हणजेच ओबीसीला मागासलेला ठेवण्याचा कट करणे, असंही प्राध्यापक हरी नरके म्हणाले आहेत.

ही जनगणना वर्गाची गणना आहे, जातींची नाही हे या तथाकथित विद्वानांना कळत नाही. अशी जणगणना करण्याचा केंद्रीय नियोजन आयोगाने निर्णय घेतला तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींनी त्याला पाठींबा दिला होता. मग आता घुमजाव का? प्रशासकीय अडचणी सोडवता येत नसतील तर सत्ता सोडा ना, असंही नरकेंनी खडसावलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!