Share

‘सोमेश्वर’ कारखान्याचा डोलारा सांभाळणे येड्या गबाळ्याचे काम नव्हे; अजित पवारांचा विरोधकांना टोला

Published On: 

बारामती : बारामती येथे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त आयोजित केलेल्या सोमेश्वर विकास पॅनेलच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोमेश्वर कारखान्याबाबत महत्वाची चर्चा केली आहे.  साहेब, मी आणि सुप्रिया सुळे विकासकामात कसूर करणार नाही, असे मत यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

‘हौसे-नवसे विरोधात कमकुवत पॅनेल टाकणार आहेत म्हणतात. पण सोमेश्वर कारखान्याचा डोलारा सांभाळणे येड्या गबाळ्याचे काम नाही. आपल्याला विस्तारीकरण करणे, जादा उसाची विल्हेवाट लावणे, चांगला भाव देणे ही कामे करायची आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळाली नाही, तरी रूसू नका. मी कुणालाही फोन करणार नाही. हे माझ्या-तुमच्या घरचे लग्न नाही. प्रपंचाची लढाई आहे, या भावनेतून काम करा.

‘काहींना थांबावे लागणार आहे, तरीही कुठलीही नाराजी नको. आम्ही तिघांनी तुमच्यासाठी काम केले आहे आणि उद्याही करणार आहोत. काहींना पुढील निवडणुकांमध्ये संधी आहे. त्यामुळे चांगला भाव मिळविण्यासाठी आपल्या पॅनेलला मदत करा. तीन आकडी मतदारांच्या गावात उमेदवारांचा विचार होईल. जिराईत भाग, खंडाळा आणि पुरंदरलाही प्रतिनिधित्व मिळेल. रविवारी (ता. ३) संध्याकाळी पॅनेल जाहीर केले जाईल.

कर्मयोगी कारखान्याला पॅनेल उभा न करणे हा आमचा अधिकार आहे. सगळीकडे नाक खुपसले पाहिजे असे नाही. सोमेश्वरला तर एकतीसशे भाव दिला, तरीही विरोध होतोय. ज्या बूथवर आपल्याला झटका बसेल, तिथे मी पण झटका देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!