मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज समाज माध्यमांवरून राज्यातील जनतेला उद्देशून मार्गदर्शन केलं आहे. ते राज्यातील कोरोना परिस्थिती, नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन, शाळा सुरु करण्यासंबंधी भूमिका, येणारे सण-समारंभ, विकासकामे, मेट्रो कारशेड अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं आहे.
दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येईल अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली होती. मात्र सद्या परिस्थिती आटोक्यात आहे. त्यामुळे थोडीफार रुग्णसंख्या वाढलेली दिसत असल्याने ३१ डिसेंबर व नाताळच्या पार्श्वभूमीवर अनेकजण नाईट कर्फ्यू लावावा अशी मागणी करत आहेत. मात्र, सद्या टाळेबंदी व नाईट कर्फ्यू लावण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, लग्न समारंभांचा हंगाम सुरु झाला आहे. या कार्यक्रमांमध्ये आवश्यक काळजी घेणं हे गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनाचा धोका अजून पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे, फोटो काढताना मास्क खाली घेतले जातात मात्र यावेळी अंतर ठेवून फोटो काढणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ‘कोरोना कसा, कधी , कुठून घुसेल सांगता येत नाही’ असं सांगत त्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.
तर, ७० ते ७५ टक्के नागरिक हे मास्क वापरत असून उरलेल्या नागरिकांनी देखील मास्क घालणं गरजेचं असल्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. प्रत्येक पावलावर सावध राहण्यास सांगणं कुटुंबप्रमुख म्हणून कर्तव्य, अनेक गोष्टी उघड्या झाल्या, गर्दी आणि रहदारी वाढल्याने हिवाळ्याच्या साथी येण्याची शक्यता असल्याचं सांगत त्यांनी अधिक सतर्कता बाळगावी असं देखील सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- 1000 कोटी खर्च करून नव्या संसद भवनाचा घाट आणि थाट कशासाठी? संजय राऊतांचा मोदींना रोखठोक सवाल!
- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक डोळ्यासमोर ठेवूनच जगतापांवर सोपविली पक्षाने मोठी जबाबदारी
- ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, तब्बल 50 लाखांचा निधी मिळवा; राजेंद्र यड्रावकरांची मोठी घोषणा
- प्रत्येक पावलावर सावध राहण्यास सांगणं हे कुटुंबप्रमुख म्हणून माझं कर्तव्य : उद्धव ठाकरे
- साध्वी प्रज्ञा सिंह यांची तब्येत बिघडली; एम्समध्ये दाखल


