🕒 1 min read
नवी दिल्ली : 2008मधल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर काल पुन्हा मुंबईतल्या विशेष न्यायालयातल्या सुनावणीच्या वेळी गैरहजर राहिल्या.
ठाकूर यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्या न्यायालयासमोर हजर राहू शकल्या नाहीत असं त्यांच्या वकीलानं सांगितलं. या प्रकरणातले अन्य एक आरोपी सुधाकर चतुर्वेदी हेही काल गैरहजर होते. न्यायालयानं याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत; सर्व आरोपींना येत्या 4जानेवारी रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले.
साध्वी प्रज्ञा सिंह या मध्य प्रदेशमधील भोपाळच्या खासदार आहेत. तिकीट देण्यापूर्वीच्या एक तासापूर्वीच त्यांना भाजपमध्ये जाहीर प्रवेश देण्यात आला होता. 2008 साली मालेगावमध्ये स्फोट झाला होता. त्यात साध्वींना आरोपी म्हणून अटकही करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
- भाजपमधील काही आमदार राष्ट्रवादीत जाणार? मलिक-भुजबळ म्हणाले…
- पंतप्रधान मोदींनी कडेकोट बंदोबस्ताशिवाय गुरुद्वारामध्ये दिली अचानक भेट
- पंतप्रधान मोदींनी गुरुद्वारामध्ये दिली अचानक भेट; कॉंग्रेसला मिरच्या झोंबल्या
- वीजचोरांचा बारामतीत सुळसुळाट; तब्बल ३६६ आकडे सापडले,कठोर कारवाई करण्याचे निर्देश
- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक डोळ्यासमोर ठेवूनच जगतापांवर सोपविली पक्षाने मोठी जबाबदारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
