Share

चहलचे टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी

Published On: 

अहमदाबाद : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ गडी राखुन विजय मिळवत पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड केली आहे. या विजयासह टीम इंडियाने ५ सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने दिलेले १६५ धावांचे लक्ष्य १७.५ षटकांत पुर्ण केले.

दरम्यान, कसोटी मालिकेत इंग्लंड संघावर दणदणीत विजय मिळाल्यानंतर इंग्लंड मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अवघ्या १२५ धावांचे माफक अव्हान इंग्लंड संघाने २ गडी गमावून लक्ष्य गाठल. सोळाव्या षटकातच इंग्लंडने विजयी लक्ष्य गाठलं. या सामन्यात, भारताचा प्रमुख फिरकीपटू म्हणून खेळणाऱ्या युजवेंद्र चहलने एक बळी मिळवत एक नवा विक्रम आपल्या नावे जमा केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू बनला आहे.

चहलने जसप्रीत बुमराहचा 59 बळींची कामगिरी मागे टाकत 60 वा बळी नोंदवला. चहलने 46 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 60 बळी घेतले आहेत. टी -20 सामन्यात 5 बळी घेण्याचीही कामगिरी चहलच्या नावावर आहे.

युजवेंद्र चहल – 60 बळी, जसप्रीत बुमराह – 59 बळी, रविचंद्रन अश्विन – 52 बळी, भुवनेश्वर कुमार – 41 बळी, कुलदीप यादव – 39 बळी,रवींद्र जडेजा – 39 बळी, हार्दिक पंड्या – 38 बळी.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!