मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. वाझे यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर सचिन वाझेंकडून या प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन नाकारला यामुळे सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. त्यांनतर शनिवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे.
एनआयएच्या विशेष न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता सचिन वाझे यांची कसून चौकशी करण्याचा राष्ट्रीय तपासयंत्रणेचा (NIA) मार्ग मोकळा झाला आहे. ‘एनआय’च्या वकिलांनी सचिन वाझे यांची १० दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. यापूर्वी शनिवारी NIA ने सचिन वाझे यांनी तब्बल १३ तास चौकशी केली होती.
दरम्यान, शनिवारी देखील वाझे यांना चौकशीमुळे थकवा जाणवत होता. यामुळे त्यांच्यावर जेजे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. तर रविवारी पुन्हा त्यांची तब्येत बिघडल्याने मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलावण्यात आले होते. या डॉक्टरांनी वाझे यांची तपासणी करून रात्री १ च्या सुमारास एनआयए कार्यालयाबाहेर गेल्याचे सुत्रांनी सांगितले. NIA ने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. याबाबतचे वृत्त एका टीव्ही चॅनलने दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पंतच्या षटकाराची कोहलीसह क्रिकेटप्रेमींनाही भुरळ
- औरंगाबादेत १०२३ कोरोनाबाधित रुग्णांची नोद, आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या
- पदार्पणातच अर्धशतक झळकावत इशान किशनने जिंकले मन
- विराट फॉर्ममध्ये परतला ; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला तिसरा कर्णधार
- कोहलीने स्टम्पवर काढली भडास ; इंग्लंडला असा झाला फायदा, नक्की काय घडले पहा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

