अहमदाबाद : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ गडी राखुन विजय मिळवत पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड केली आहे. या विजयासह टीम इंडियाने ५ सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने दिलेले १६५ धावांचे लक्ष्य १७.५ षटकांत पुर्ण केले.
या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद 73 धावांची खेळी केली. तर पदार्पणवीर इशान किशनने 56 धावांची खेळी केली. विराट या नाबाद खेळीसह फॉर्ममध्ये परतला. त्याने या खेळीचं श्रेय आफ्रिकेचा मिस्टर 360 असलेला फलंदाज एबी डी व्हीलियर्सला दिलं. गेल्या काही सामन्यांपासून विराटला धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. तो सलग 2 वेळा शून्यावर बाद झाला होता.
त्यावर विराट म्हणाला, “मी बारीक बारीक गोष्टीवर लक्ष दिलं. संघाच्या विजयात मी योगदान दिलं हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळे मी 70 धावांच्या खेळीपेक्षा संघाचा विजय झाला यासाठी आनंदी आहे. मी प्रत्येक चेंडूवर लक्षं ठेवलं. अनुष्का माझ्यासोबत इथे आहे. ती माझ्या पाठीशी आहे. मी या सामन्याआधी एबीसोबत चर्चा केली. त्यावर मला एबीने फक्त चेंडूवर लक्ष देण्याचा सल्ला दिला. मी त्याचा सल्ला मानला. त्याने सांगितलं तसं केलं”, असं म्हणतं विराटने आपल्या खेळीचं श्रेय एबीला दिलं.
महत्त्वाच्या बातम्या
- पंतच्या षटकाराची कोहलीसह क्रिकेटप्रेमींनाही भुरळ
- औरंगाबादेत १०२३ कोरोनाबाधित रुग्णांची नोद, आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या
- पदार्पणातच अर्धशतक झळकावत इशान किशनने जिंकले मन
- विराट फॉर्ममध्ये परतला ; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला तिसरा कर्णधार
- ‘भंपक गोस्वामीला पकडले, टीआरपी घोटाळा उघड केला त्या बदल्यात केंद्राने वाझेंना पकडून दाखवले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

