मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतच्या कार्यालयावर कारवाई करत तिचे कार्यालय तोडण्यात आले होते. यावरून कंगनाने न्यायालयात धाव घेतली होती. आता, उच्च न्यायालयानं बीएमसीची ही कारवाई अवैध ठरवली आहे. ‘महापालिकेने बजावलेली नोटीस आणि त्यानंतर तोडकामाचा काढलेला आदेश दोन्ही रद्दबातल करतानाच, ते कार्यालय महापालिकेला पूर्ववत करून द्यावे लागेल,’ असंही न्यायालयानं स्पष्ट केलं होत.
कालच, महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली. २०१९ विधानसभांच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबत असलेला संसार मोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. यानंतर, हे तीनचाकी सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असं भाकीत करून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
यासर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून आज ‘रोखठोक’ भाष्य केलं आहे. ‘एखाद्या नटीचे बेकायदेशीर बांधकाम पाडणे हे सध्याच्या काळात बेकायदेशीर ठरत आहे, तेथे बहुमतातील सरकार पाडण्याचे प्रयोग घटनाबाह्य, बेकायदेशीर आहे असे बोलणे गुन्हा ठरू शकतो. अशा प्रवृत्तीविरोधात महाराष्ट्र म्हणून लढावे लागेल.’ अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुन्हा फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देईन : उदयनराजे भोसले
- ‘अजित पवारांवर लक्ष्य ठेवा असं अलीकडे सांगितलं जातंय, पण…’
- ‘भाजपने घड्याळ व पवार मुक्त करण्याची स्वार्थी घोषणा केली, मात्र…’ : सुनिल शेळके
- ‘संजय राऊतांच्या नातेवाईकांना देखील ईडीच्या नोटीसा’; नितेश राणेंचा दावा
- बिबट्यास शोधून जेरबंद करण्यासाठी तब्बल सतरा पथके स्थापन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

