🕒 1 min read
मुंबई : बॉर्डर -गावसकर मालिका 2-1 ने जिंकली. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर सर्वत्र भारतीय संघाचं कौतुक होत आहे. भारताच्या या विजयाचा नायक ठरला तो यष्टिरक्षक रिषभ पंत. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेपासून रिषभ पंत सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत येत आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर रिषभ आता भारतात परतला आहे. भारतात परतल्यानंतर रिषभने ट्विटरवर पोस्ट केली की, तो नवे घर शोधत आहे त्यासाठी पर्याय सांगा. यावर भारताचा माजी क्रिकेट खेळाडू इरफान पठाणने रिषभची फिरकी घेतली आहे.
Jabse Australia se aaya hoon gharwale peeche pade hain ki naya ghar le lo ab. Gurgaon sahi rahega? Aur koi option hai toh batao.
— Rishabh Pant (@RishabhPant17) January 28, 2021
रिषभने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर लिहिले,’जेव्हापासून ऑस्ट्रेलियातून आलो आहे तेव्हापासून घरचे मागे लागलेत की नवीन घर घे. गुरगाव योग्य असेल का ? आणखी काही पर्याय असेल तर सांगा.’ रिषभच्या या ट्विटवर इरफान पठाणने मजेशीर कमेंट करत लिहले, ‘क्रिकेट ग्राउंड खरेदी करणे, कसे राहिल?’ रिषभच्या या पोस्टवर इरफान प्रमाणेच चाहत्यांनी देखील मजेशीर कमेंट्स केलेल्या आहेत.
How about buying a cricket ground ??
— Irfan Pathan (@IrfanPathan) January 28, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती’
- शेतकरी आंदोलनात फूट पडल्यामुळे या लढ्याला काही अर्थ उरला नाही : नरेश टिकैत
- ऑस्ट्रेलियामधील वर्णभेद घटनेनंतर इंग्लंडने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
- सलग चौथ्या वर्षी मालमत्ता करवाढ न करण्याचा आयुक्ताचा निर्णय
- कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष करणार; निलेश राणेंची सिंहगर्जना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

