Share

‘उद्धव ठाकरे बनणे अवघड देव पण परत अशी चूक करायची हिम्मत नाही करणार’

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने  कोरोना रुग्ण वाढत आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा लागू करण्याबाबतचा इशारा दिला आहे. लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर पुढच्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला आहे.

मात्र मुख्यमंत्र्यांच्या या इशाऱ्या नंतर विरोधकांपासून ते सर्वसामान्य नागरिकांनापर्यंत, उद्योजकांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत आणि फेसबुकपासून ट्विटपर्यंत सर्वत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर टीकेची झोड उठली आहे. मात्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भावनिक पोस्ट लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्याला सलाम केला. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांना दोघांना कोरोना ची लागण झाली असून मुख्यमंत्री काम करत आहेत. असे म्हटले होते.

‘पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय.टिका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत.. त्यास सलाम! सलाम!! सलाम!!!’ असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच कौतुक करत विरोधकांना फटकारले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या याच पोस्टचा धागा पकडत भाजपचे नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘आव्हाड बरोबर बोलले..उद्धव ठाकरे बनणे अवघड आहे..कारण देव पण परत अशी चूक करायची हिम्मत नाही करणार..अशी चूक एकदाच होते!! महाराष्ट्राची वाट लावणे..महाराष्ट्र विकायला काढणे.. कुटुंबा पलीकडे नाही बघणे..म्हणजे महाराष्ट्र सांभाळणे म्हणतात!!! मग उद्धव ठाकरेना तुमच्या कडेच ठेवा..आणि रोज उठून सलाम ठोकत बसा..आव्हाड साहेब’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी टीकास्त्र डागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!