Share

समोर ‘वर्दी’ अन पाठीमागे खवय्यांची ‘गर्दी’

Published On: 

औरंगाबाद : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील हॉटेल्स, नाश्ता सेंटरवर बंदी घालून पार्सल सेवा सुविधांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र शहरातील गल्लीबोळ्यांमध्ये आतल्या भागांमध्ये अनेक नाश्ता सेंटर्स प्रशासनाच्या नाकाखाली गर्दी जमवत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत बिनदिक्कतपणे आपला व्यवसाय चालवत आहेत.

टीव्ही सेंटर भागातील एका छोट्या हॉटेलवर  पोलीस प्रशासनाचे, मनपाच्या नागरी मित्र पथकाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. टिव्ही सेंटर येथील पोलीस स्टेशनच्या मागेच असे प्रकार घडत असल्याने समोर वर्दी तर पाठीमागे खवय्यांची गर्दी असे म्हणण्याची वेळ आली आहे. येथे दिवसा ‘खवय्यांची’ तर रात्री ‘दारुड्यांची’ मैफिल भरत आहे.

११ मार्चपासून जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन करण्यात आले आहे. यात शनिवार व रविवार संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. १७ मार्च पासून हॉटेलमध्ये बसतांना होत असलेली नियमांची पायमल्ली पाहता जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद शहरातील हॉटेल्सची डायनिंग सुविधा, नाश्ता सेंटर, धाबे, फूड पार्क पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात डिलिव्हरी सेवांना परवानगी देण्यात आली आहे.

मात्र असे असले तरीही शहरातील टिव्ही सेंटर भागात असलेल्या पोलीस स्टेशनच्या मागच्या गल्लीत असलेल्या अग्रवाल नाश्ता सेंटरमध्ये नियमांची मोठ्या प्रमाणावर पायमल्ली होत आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन न करता याठिकाणी दररोज सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे. याठिकाणी खाद्यपदार्थ घेऊन येथेच उभे राहत नाश्ता करतात. विनामास्क नागरिक एकत्र उभे राहत असल्याने कोरोनाच्या संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

रात्री जमते दारुड्यांची मैफिल

दिवसा नाश्ता सेंटरवर येणारे नागरिक तर रात्री मद्यपान करणाऱ्यांचे टोळकेच्या टोळके याठिकाणी पाहायला मिळतात. टिव्ही सेंटर चौकात दोन ते तीन बिअर बार असल्याने या गल्लीत रात्र होताच दारुड्यांची मैफिल जमलेली पाहायला मिळते. यामुळे या भागातील महिला आणि मुली यांना आपला रस्ता बदलत जावे लागते. महिनाभरापूर्वी सिडको पोलीस ठाण्यात याविषयी समस्त नागरिकांनी मिळून तक्रार दाखल केली होती. मात्र एक ते दोन वेळा पोलीसांनी याठिकाणी चक्कर मारली. मात्र नंतर कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!