Share

एक पैसाही राज्य सरकारनं नागरिकांना मदतीसाठी दिलेला नाही; फडणवीसांचा घणाघात

Published On: 

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेशी सवांद साधत आहेत. मुख्यमंत्री आज लॉकडाऊन करणार का ? असा प्रश्न आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला होता. यामुळेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्या संबोधनाच्या सुरुवातीलाच घाबरू नका, मी तुम्हाला घाबरवायला नाही आलो नाही असे उद्गार काढले आहेत. त्याच बरोबर त्यांनी यावेळी नागरिकांना संभाव्य लॉकडाऊनचा इशारा देखील दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या संबोधनावर विरोधी पक्षांनी हल्ला चढवला आहे. महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्या राज्याने कोरोना काळात लॉकडाऊन केल्यानंतर नागरिकांना मदत केलेली नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात कोरोना वाढण्याची कारणं सांगितली नाही. उपाययोजनाही सांगितल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे, नागपूर सारख्या ठिकाणी काय उपाययोजना करणार आहोत हे मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं होतं. राज्यात अनेक ठिकाणी बेड मिळत नाही. ते का मिळत नाहीत, त्यावर काय करणार आहोत, हे सांगणं अपेक्षित होतं. काल जे मुख्यमंत्र्यांनी भाषण केले त्यात ना कोरोना वाढण्याबाबत भाष्य करण्यात आलं, ना उपाययोजनांची माहिती देण्यात आली, अशी टीका फडणवीस यांनी केली.

यावेळी फडणवीस यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली. आव्हाडांना विस्मरणाचा रोग झाला आहे. राज्यातील जनतेला मदत न करणारं हे देशातील एकमेव सरकार आहे. केंद्र सरकारने 20 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं. इतर राज्यांनीही पॅकेज जाहीर केलं. पण या सरकारने काहीच केलं नाही. उलट लोकांची वीज कापली आणि लोकांना त्रास दिला. कोविड काळात लोकांना त्रास देणारं हे एकमेव सरकार आहे. महाराष्ट्र राज्याने एक पैसाही नागरिकांना मदतीसाठी दिलेला नाही, असं फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!