मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होते. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला होता. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आणि महाराष्ट्रासह देशात एकच खळबळ माजली होती.
या आरोपानंतर विरोधकांकडून देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. तसेच याचदरम्यान अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. अॅड. जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी ही तक्रार दिली होती. ‘भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट होण्याअगोदर भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली संबंधित व्यक्ती आणि मंत्र्याला अटक व्हावे,’ अशी मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केली होती.
याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयातील आपल्या याचिकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. ऍड. जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच हा लोकप्रियतेसाठी केलेला स्टंट असल्याचे निरिक्षण नोंदवत पाटील यांना फटकारले आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर हायकोर्टाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हा अर्ज फेटाळून लावताना मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की स्वस्त लोकप्रियता मिळवण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पिटाळे यांच्या खंडपीठाने वकील जयश्री पाटील यांच्या अर्जावर सुनावणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- निधी वाटपात होत असलेला भेदभाव दूर करा; कॉंग्रेस नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- मोठी बातमी : सरकारच ठरल ! महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी होणार लॉकडाऊन ?
- एक पैसाही राज्य सरकारनं नागरिकांना मदतीसाठी दिलेला नाही; फडणवीसांचा घणाघात
- देशात कोरोनाचा विस्फोट; कालची आकडेवारी पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात
- मोठी बातमी : सरकारच ठरल ! महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी होणार लॉकडाऊन ?


