पैठण : पाणी भरण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरूणीचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील थेरगाव येथे शनिवारी (दि.३) सकाळी सातच्या दरम्यान घडली. पूजा राम चोरमले (वय १८) वर्षे असे मृत्यू झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचे नाव आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, थेरगाव शिवारात राम चोरमले हे कुटुंबासह शेतातील वस्तीवरच वास्तव्य करत होते. त्यांची मुलगी पुजा चोरमले ही सकाळी सातच्या दरम्यान आपल्या घराशेजारील विहीरीवर पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेली होती. परंतु पाणी भरत असतांना कठड्यावरून घसरून ती विहिरीत पडली. पूजा ही विहिरीवर पाणी भरण्यासाठी जावून एक तास झाला तरीही पाणी घेऊन घरी परतली नाही.
त्यामुळे घरातील नातेवाईकांनी त्या विहिरीवर जाऊन पाहिले असता त्यांना विहिरीमध्ये पाणी काढण्याची बकेट दिसून आली. त्यावेळी घरातील नातेवाईकांना पूजा हि विहिरीत पडल्याची शंका आल्यामुळे या घटनेची माहिती तात्काळ गावातील नागरिकांसह पाचोड पोलिस ठाण्यात कळविली. पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी शिंदे, फेरोज, बर्डे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असुन पूजा चोरमले हिला विहिरी बाहेर काढले.
पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी रोहीत जैन यांनी पूजा हिला तपासून मृत घोषित केले असून तिच्यावर उत्तरय तपासणी करण्यात आली असून या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या दुखद घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ कारणामुळे लग्न समारंभाना सशर्त अटींसह पुन्हा मिळाली परवानगी!
- गृहमंत्र्यांविरोधातील याचिका म्हणजे निव्वळ ‘स्टंट’; न्यायालयाने जयश्री पाटील यांना झापलं
- निधी वाटपात होत असलेला भेदभाव दूर करा; कॉंग्रेस नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- समोर ‘वर्दी’ अन पाठीमागे खवय्यांची ‘गर्दी’
- एक पैसाही राज्य सरकारनं नागरिकांना मदतीसाठी दिलेला नाही; फडणवीसांचा घणाघात


