Share

अजितदादांनी केली मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर सही ; उद्या होणार निर्णय

Published On: 

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात देखील आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत असून मागील लाटेपेक्षा यंदा स्थिती गंभीर झाली आहे. ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे गरजेचं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले कि, ‘मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर सही करण्यात आली आहे. उद्या कॅबिनेटची बैठक होणार आहे. त्यात सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल, असं पवार म्हणाले. मोफत लसीकरणावर मी आज थेट काही भाष्य करू शकत नाही. बैठकीला अवघे 24 तास बाकी आहेत. तोपर्यंत कळ सोसा. आज मी काही भाष्य केलं आणि उद्या कॅबिनेट चर्चेच्या अनुषंगाने आणखी वेगळा प्रस्ताव आला तर अजित पवारांची मागणी फेटाळली, अशी ब्रेकिंग न्यूज तुम्हीच कराल. त्यामुळे थोडावेळ थांबा, असं त्यांनी सांगितलं.

राज्यात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याच्या प्रस्तावावर मी सही केली आहे. उद्या हा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीत येणार असून त्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, असं सांगतानाच आर्थिक भाराचा कोणताही निर्णय मुख्यमंत्रीच घेत असतात, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे उद्या बुधवारीच मोफत लसीकरणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!