मुंबई : राज्यातील 50 हजार ते 1 लाख लोकसंख्येच्या नगर परिषेच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सुमारे 4 वर्षे बारामती नगर परिषद नापास होत आहे. कचरामुक्त शहराला शून्य गुण मिळाले आहेत. सत्ताधारी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे पाहायला मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पंतप्रधान पदाचे दावेदार म्हंटलं जातं. यावरुनच भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
पवार सगळ्यात नापास, एक तालुका, एक शहर सांभाळता येत नाही आणि म्हणे पवार पंतप्रधानपदाचे दावेदार. महाराष्ट्राची वाट लावली या कुटुंबाने पण फक्त आम्ही फार मोठे आहोत हे दाखवण्यात यशस्वी ठरले बाकी कामं सगळी बोगस, असं निलेश राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, देशात 2 ऑक्टोबर 2014 पासून केंद्र सरकारमार्फत ‘स्वच्छ भारत अभियान’ देशभरात राबवले जात आहे. बारामती नगर परिषदेने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’पासून राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतला होता. यामध्ये 2019मध्ये 325व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. याच मुद्द्यावरुन निलेश राणेंनी शरद पवारांवर टीका केली आहे.
पवार सगळ्यात नापास, एक तालुका, एक शहर सांभाळता येत नाही आणि म्हणे पवार पंतप्रधानपदाचे दावेदार. महाराष्ट्राची वाट लावली या कुटुंबाने पण फक्त आम्ही फार मोठे आहोत हे दाखवण्यात यशसवी ठरले बाकी कामं सगळी बोगस. pic.twitter.com/7mUlhnymmG
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 1, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘आमचा कोणताही घोटाळा बाहेर काढून दाखवावा, त्यांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही’
- ‘चैत्यभूमीवर यंदाही प्रवेश बंदी केली, दुतोंडी खंडणी सरकारचा जाहीर निषेध’
- ‘उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, आमच्या गरिबांच्या लेकरांच काय?’
- ममता बॅनर्जी-शरद पवार यांची आज भेट; तृणमूल महाराष्ट्र भाजपाला देणार आव्हान?
- ‘हा घ्या पुरावा, हिंदूंच्या हत्याऱ्यांपुढे मस्तक झुकवणारे हिंदूह्रदयसम्राटांचे वारस’

