Share

‘आमचा कोणताही घोटाळा बाहेर काढून दाखवावा, त्यांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही’

Published On: 

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्प संख्यांक मंत्री नवाब मलिक आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यात जोरदार कलगितुरा रंगला आहे. ‘महाविकास आघाडीच्या दोन वर्षांच्या भ्रष्ट कारभाराने महाराष्ट्र २५ वर्षे मागे गेला आहे. राज्यात सत्ताबदल होणार या हवेतील गप्पा नाहीत. हा बदल १०० टक्के होणार आहे. भाजप विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष आहे. आम्ही कुणाला सोबत घेऊ, हे आत्ताच सांगणार नाही. वेळ आल्यावर सारे घडेल,’ असं वक्तव्य प्रविण दरेकर यांनी केलं आहे.

मुंबई जिल्हा बँकेचा कोणताही पैसा स्वतःसाठी वापरलेला नाही. बँकेची बदनामी केल्यास बँकेच्या ठेवीदारांवर, व्यवसायावर परिणाम होतो. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी जपून बोलावं. नवाब मलिक यांनी आमचा कोणताही घोटाळा बाहेर काढावा. त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही, असंही प्रविण दरेकर यांनी दिलं आहे.

महापूर, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला महाविकास आघाडी सरकारने केवळ पाने पुसली आहेत. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. सर्वच आघाड्यांवर महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलं आहे, अशी टीकाही यावेळी प्रविण दरेकर यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!